आज कितीतरी दिवसांनी माझ्या ब्लॊगवर लिहायल बसले आहे....
खरंतर गेले कित्येक दिवस मी ब्लॊगवर लिहायचं असं ठरवते आहे. पण लिहायचा मूडच लागत नव्हता. कितीतरी वेळा मी अर्धवट पोस्ट लिहून नंतर डिलीट करून टाकलं. अगदी आतून लिहावसं वाटत नसताना उगाचच काहीतरी खरडण्यात काय अर्थ आहे? पण नंतर भीती वाटली की समजा अगदी कधीच वाटलं नाही लिहावसं तर मग माझा ब्लॊग मृत ब्लॊगांमध्ये जाईल का? म्हणून अगदी सरसावून पोस्ट लिहायला बसलीये खरी.
आता हे लिहिताना वाटतंय, समजा गेला मृत ब्लॊग मध्ये तर काय फरक पडणार आहे? नाहीतरी कोण इतकं चातकासारखी वाट बघतंय मी काय लिहितीये त्याची? हजारो लाखो ब्लॊग मधला एक बंद झाला तर कोणाला काय फरक पडणार आहे? मग मी कशासाठी हा लिहिण्याचा अट्टाहास करतीये?सगळे लिहितात म्हणून आपण पण काहीतरी खरडतोय ह्याला काय अर्थ आहे?
पण मग लक्षात आलं की कोणी सांगितलं म्हणून मी ब्लॊग कुठे सुरू केला होता? मला काय वाटतं ते लिहिण्यासाठीच तर मी हा ब्लॊग सुरू केलाय. मग मला जे काय वाटतंय, मग भले ते फालतू का असेना, मी ह्या ब्लॊगवर लिहू शकेन. मग त्यासाठी मला हा ब्लॊग जिवंत ठेवायलाच हवा.
आज अगदी अनायसे दसर्याच्या सुमुहुर्तावर पोस्ट लिहायचं मनात आलं आहे तर हे पोस्ट कितीही बोरींग असलं तरी टाकतीये. आणि आता नियमाने लिहायचं असं ठरवतीये. बघू या कितपत जमतंय!!!
रविवार, ऑक्टोबर २१, २००७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)