आभाळ दाटुनी येता, मन मोहरून जाते,
अन मनात दरवळतो आठवणींचा मरवा
झरझर झरती धारा, रान चिंब चिंब होते
चराचरात फुलतो नववधूचा गोडवा
भिजलेल्या अंधारातून ही साद कुठूनशी येते
ढगाआडुनी हसतो, पुनवेचा चांदवा
पाचूच्या शेल्यावरती इंद्रधनूची किनार खुलते
मेंदीने केशरी सजतो स्पर्श रेशमी हळवा
मनी दाटल्या आठवांची डोळ्यातून सर कोसळते
तरी मनात भरूनी उरतो ओला श्रावण हिरवा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
खुपच सही लिहिले आहेस ग.. आणखी छान छान कविता post कर - रुपाली.
टिप्पणी पोस्ट करा