शुक्रवार, मार्च ०२, २००७
ऋतुरंग - ३
पावसाळ्यातली शिरशिरी आणाणारी थंडी संपून ऑक्टोबर हीटचा तडाखा संपला की खरीखुरी थंडी सुरू होते. गुलाबी थंडी वगैरे प्रकार काही मला कळत नाहीत पण कडाक्याची तंडी असली तरी मजाच येते. थड़ी सुरू होण्याच्या सुमाराला सबंध सह्याद्री अंगोपांगी फुललेला असतो. कोणत्याही घाटात, इतकंच काय अगदी सिंहगड, तळजाई वाघजाईला गेलं तरी इतक्या रंगांची आणि आकारांची फुलं फुललेली असतात की नजर ठरत नाही. रंगांची नुसती उधळण असते सगळीकडे. फुलांचे गालीचेच पसरलेले असतात जणू हिवाळ्याच्या स्वागतासाठी . नुसती फुलंच नाही , तर सगळ्याच गोष्टी निसर्ग अगदी भरभरून उधळत असतो.भरपूर विविधरंगी भाज्या, फळं सगळ्याचीच रेलचेल असते. पावासाळ्यातल्या सृष्टीचं नवपरिणीतेचं रूप जसं सुखावणारं असतं ना, तसंच हे परीपूर्ण रूपही तितकंच खुलून दिसतं.मग हळूहळू सगळं चैतन्य ओसरायला लागतं उन्हं चढायला लागतात आणि परत मोगर्याचे आणि आंब्याचे वेध लागातात!!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा