मी उभा होतो किनार्यावर
शांत, स्तब्ध, निश्चल
आणि एक तडाख्यात चिंब चिंब करून गेलीस तू....
वरवर तसं काहीच नाही बदललं
पण आतपर्यंत काहीतरी हललं नक्कीच
थोडंसं गूढ, तरी हवंहवंसं..
तू भरतीचं उधाण लेऊन येताना,
कोसळलीच तुझी आतुरता
आणि ओहोटीसंगे मागे फिरलीस ना,
तेव्हा जाणवली तुझी कासवीस नजर......
असह्यच झाला मला माझा निश्चलपणा!
आणि मग हळूहळू
कणाकणाने तुटत गेलो मी
आता इतरांनाही जाणवलाय बदल
लोक म्हणतात 'खडक झिजला किनार्याचा'
बरोबरच आहे, त्यांना कसं कळणार
आता माझा प्रवास अखंड तुझ्या सोबतच-
किनार्यावरची रेती होउन!!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
३ टिप्पण्या:
great to see a blog in hindi
अतीव सुंदर!
Too good !! Hope to see more :-)
टिप्पणी पोस्ट करा